कधी कधी काही ग्रुप्स किंवा व्यक्ती सतत मेसेज करतात – अशावेळी तुम्ही त्यांना कायमचं Mute करू शकता. आता ‘Always Mute’ पर्याय उपलब्ध आहे.
तुमचा WhatsApp Status कोणाला दिसावा, कोणाला नाही, हे तुम्ही निवडू शकता. “My contacts except…” किंवा “Only share with…” हे पर्याय वापरून Status गोपनीय ठेवा.
कोणताही चॅट conversation तुम्ही टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये email किंवा PDF स्वरूपात सेव्ह करू शकता. हा फिचर ऑफिस किंवा महत्त्वाच्या गप्पांसाठी खूप उपयुक्त आहे.
कोणताही मेसेज 'Star' केल्यावर तो Starred Messages विभागात साठतो. ज्यामुळे ते शोधायला बरं पडत.
तुम्ही पाठवलेले फोटो किंवा व्हिडीओ रिसीव्हरला फक्त एकदाच बघता येतील. हे खाजगी गोष्टी शेअर करताना फार उपयुक्त ठरतं.
WhatsApp वर Communities फिचरने एकाच ठिकाणी अनेक ग्रुप्स एकत्र करता येतात. शाळा, ऑफिस, संस्था यासाठी खूप फायदेशीर!