दूरसंचार विभागाने सिमकार्ड खरेदी-विक्रीच्या नियमांत महत्त्वाचे बदल केले आहेत.

बनावट सिमकार्डमुळे होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कठोर झाले आहे.

हे नियम 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार होते.

सिमकार्ड खरेदी-विक्रीच्या नियम-

1

नवीन नियमांनुसार, सिम कार्ड विक्रेत्यांना सिम कार्ड खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे योग्यरित्या केवायसी करावी लागेल.

2

सरकारने सिम कार्ड खरेदीदार आणि विक्रेते यांना एकाच वेळी अनेक सिम कार्ड खरेदी करण्यावर बंदी घातली आहे.

3

म्हणजे वापरकर्ते एकाच वेळी अनेक सिम कार्ड जारी करू शकणार नाहीत.

4

तसेच, एका आयडीवर मर्यादित संख्येत सिम कार्ड जारी केले जातील.

5

नियमांनुसार, सर्व सिम विक्रेत्यांना म्हणजेच पॉइंट ऑफ सेलसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणे अनिवार्य आहे.

6

या सर्व नियमांचे उल्लंघन केल्यास 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. तसेच तुम्हाला तुरुंगात जावे लागेल.