हार्दिक पांड्याकडे एक ऑल-राऊंडर खेळाडू म्हणून पाहिलं जातं. दुखापतीनंतर संघात परत येताच त्याचा फॉर्म सुधारला आहे.
पांड्याकडे टीम इंडियाचा भावी कर्णधार म्हणूनही पाहिलं जातं. सध्या हार्दिक पांड्याकडे टी20 संघाचं नेतृत्व आहे. पण वनडेसाठीही तो एक उत्तम खेळाडू आहे.
हार्दिक पांड्या वगळता भारताकडे असा अष्टपैलू खेळाडू नाही जो सर्व तिन्ही फॉर्ममध्ये चांगलं खेळू शकतो. असं असताना टीम इंडियाच्या एका खेळाडूने स्वत:ची तुलना हार्दिक पांड्यासोबत केली आहे.
दुखापतीमुळे अनेक दिवस मैदानापासून लांब असलेल्या दीपक चहरने स्वत:ची तुलना हार्दिक पांड्यासोबत केली आहे.
हार्दिक पांड्याप्रमाणे ऑल-राऊंडर खेळाडूची निवड करण्यावर निवड अधिकाऱ्यांचा भर असेल. दीपक चहरला वाटतंय की तो हार्दिकच्या खेळाशी बरोबरी करु शकतो.
दीपक चहर यानी म्हटलं आहे की, ''मी 140 किमी वेगाने गोलंदाजी करु शकतो, बॉल स्विंग करु शकतो आणि अलिकडे माझ्या फलंदाजीमध्येही चांगली सुधारणा झाली आहे.''
चहरने त्याच्या फलंदाजीच्या कौशल्याबाबत म्हटलं आहे की, ''स्पर्धा खूप खडतर आहे त्यामुळे तुम्हाला स्वतःला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करावं लागेल.''
''मी लहान असल्यापासून फलंदाजी हा माझ्यासाठी प्लस पॉइंट आहे. गेल्या वर्षी मला संधी मिळाल्याने मला धावाही करता आल्या.'' असंही चहरने म्हटलं आहे.
चहर पुढे म्हणाला की, ''हार्दिक पांड्याकडे पाहा, तो तिन्ही गोष्टी करतो वेगवान गोलंदाजी, स्विंग आणि फलंदाजी.''
भारतीय संघात आता किमान एक किंवा दोन वर्षे इतर कोणीही हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकत नाही, असंही चहरने म्हटलं आहे.