भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे देशातील कोरोनाच्या संसर्गात वाढ कायम आहे गेल्या 24 तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे मंगळवारी दिवसभरात देशात पाच हजार 233 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे ही मागील तीन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण वाढ आहे मार्चनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर पोहोचली आहे देशात सध्या 28 हजार 857 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण 1881 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत गेल्या 24 तासांत दिल्लीत 450, मध्य प्रदेशात 236, तामिळनाडू 114, गोव्यात 62, छत्तीसगडमध्ये 10 कोरोनाबाधित आढळले आहेत