फिरकीचे जादूगार शेन वॉर्न यांचे 4 मार्च, 2022 रोजी आकस्मित निधन झाले. एक महान क्रिकेटपटू म्हणून ते कायम स्मरणात राहणार आता त्यांना ट्रिब्यूट म्हणून ऑस्ट्रेलिया क्रिकेटने एक महान पुरस्कार शेन यांच्या नावाने केला सुरु क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता शेन वॉर्न यांच्या नावाने एक प्रतिष्ठित पुरस्कार देण्याचा घेतला निर्णय पुरुष कसोटी खेळाडू ऑफ द इयर पुरस्कार आता शेन यांच्या नावाने या पुरस्काराचे नाव 'शेन वॉर्न टेस्ट प्लेयर ऑफ द इयर' असेल. जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्न यांची ख्याती होती. ऑस्ट्रेलियाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे. वॉर्न यांनी 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 गड्यांना माघारी धाडलं आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळवल्या आहेत.