सकाळची सुरुवात दुधाचा चहा आणि बिस्किटांनी करणारे अनेक जण आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अशा विविध वयोगटात चहा-बिस्कीटचा नाश्ता हा आवडीचा नाश्ता आहे.
रिकाम्या पोटी चहा पिण्यापेक्षा बिस्किटे खाणे चांगले, त्यामुळे आम्लपित्त होणार नाही असे मानणारे काहीजण आहेत. पण असे करणे आरोग्याच्या दृष्टीने हे योग्य नाही.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहा आणि बिस्किटे एकत्र कधीही खाऊ नयेत. बिस्किटे बनवण्यासाठी रिफाइंड पीठ आणि हायड्रोजन फॅट्स वापरतात.
त्यामुळे वजन आणि लठ्ठपणा दोन्ही वाढू लागतात. यामुळेच डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ चहा आणि बिस्किट एकत्र खाण्याचा सल्ला देत नाहीत.
चहा-बिस्कीट खाल्ल्याने काही क्षणांसाठी आपल्याला काही खाल्ल्याचा आनंद वाटू शकतो. मात्र, आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो.
सध्याची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसू लागतात. याकडे दुर्लक्ष करता कामा नये. चहा-बिस्किट हे कॉम्बिनेशन देखील या समस्येचे मुख्य कारण आहे.
बिस्किटांमध्ये आढळणाऱ्या रिफाइंड साखरमध्ये कोणतेही पौष्टिक घटक नसतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात.
हेल्दी फॅट्सचा आहारात समावेश केल्याने चेहऱ्याला कोणतीही हानी होत नाही आणि त्वचाही चमकदार होते.
चहा-बिस्किट एकत्र खाल्ल्याने दात खराब होऊ शकतात. चहा-बिस्किटमध्ये आढळणाऱ्या सुक्रोन्झमुळे दात किडतात.
चहा बिस्किटे जास्त प्रमाणात खाल्ल्याने दातांचे अनेक आजार होऊ शकतात. त्याच्या परिणामी दात पडणे, दात किडणे, दाढ दुखणे, काळे डाग पडणे, दाढेमध्ये खड्डा पडणे आदी समस्याही चहा-बिस्किटांमुळे होऊ शकतात.