तमिळनाडूमध्ये मुसळधार पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

राज्यात पाऊसामुळे झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापार्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्याची स्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळ आज तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचू शकते.

या चक्रिवादळामुळे 9 राज्यांमध्ये रेड अलर्ट जाहिर करण्यात आला आहे.

तमिळनाडूची राजधानी चेन्नई आणि आसपासच्या परिसरात पाऊसाच्या तुरळक सरी बरसल्यानंतर आता पुन्हा मुसळधार पाऊस पडत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळ आज संध्याकाळी तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरून जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस तमिळनाडूमधील विस्तृत भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागामने दिलेल्या माहितीनुसार, काही बागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

9 जिल्ह्यात रेड अलर्ट, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू!