अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

ती आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते.

फार कमी वेळातच पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.

पूजा सावंतने 'क्षणभर विश्रांती' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.

त्यानंतर पोष्टर बॉईज, नीळकंठ मास्टर, दगडी चाळ, भेटली तू पुन्हा अशा अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली.

पूजा अनेकदा आपले क्लासी, बोल्ड, ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

परंतु, यावेळी पूजाने दिवाळीनिमित्त पारंपरिक लूक परिधान केलाय

पूजा सावंतचा हा मराठमोळा साज चाहत्यांना आवडला असून चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पूजाचा हा ट्रेडिशनल अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

केसात गजरा, चेहरा हसरा; पूजा सावंतवर सर्वांच्या नजरा!