बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. त्यांचा आज 54 वा वाढदिवस आहे. आशुतोष राणा यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1967 रोजी गाडरवाडा येथे झाला. लहानपणापासूनच आशुतोष यांना अभिनयाची आवड होती. अशुतोष यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना लॉची प्रॅक्टिस करायची होती. पण त्यांच्या गुरूंनी त्यांना अभिनय क्षेत्रात काम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आशुतोष यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. तिथूनच त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली. 2001 मध्ये अशुतोष यांनी अभिनेत्री रेणुका शहाणेसोबत लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पगलैट या चित्रपटातील अशुतोष यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अभिनय नाही तर या क्षेत्रात करणार होते करीअर