'बाहुबली' फेम तमन्ना भाटिया आणि 'दहाड' अभिनेता विजय वर्मा सध्या चर्चेत आहेत.
तमन्ना आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी रंगली होती
दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.
अखेर आता तमन्नाने विजयबरोबर असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांना गोव्यातील एका पार्टीत स्पॉट करण्यात आले होते.
या पार्टीतील दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
या व्हिडीओमध्ये ते एकमेकांना किस करताना दिसत होते
त्यानंतर ते रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.
अनेकदा दोघे एकत्र दिसले असले तरी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही भाष्य केलं नाही.
तमन्नाने नुकत्याच एका मुलाखतीत रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं आहे.