बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
नुकतीच करण जौहरच्या 'रामायण' सिनेमाच्या कास्टिंगबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली होती.
आता पंगाक्वीनबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे.
कंगनाचा व्हायरल व्हिडीओ हा तिच्या ऑफिसबाहेरचा आहे.
कंगनाने पापराझींना लग्न पत्रिकादेखील दिली आहे.
या पत्रिकेवर 'टीकू वेड्स शेरू' असं लिहिलेलं आहे.
पापराझींना लग्न पत्रिका देतानाचा व्हिडीओ शेअर करत
कंगनाने तिच्या 'टीकू वेड्स शेरू' या सिनेमाचं प्रमोशन केलं आहे.
कंगनाच्या या व्हिडीओनंतर ती लग्नबंधनात अडकणार
असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.