बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान तिच्या अभिनयानं आणि फॅशननं अनेकांची मनं जिंकते.



सारा सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.



तिचे फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सारानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं.



एका मुलाखतीमध्ये सारानं सांगितलं तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन चार वर्ष झाले.



त्यानंतर सारानं स्वत:च्या पर्सनालिटीमध्ये बदल केले. साराला तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ट्रोल केले जाते.



याबाबत साराला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं. त्यावेळी ती म्हणाली,



'मी अशी मुलगी आहे जी मंदिरात देखील जाते आणि मला बीचवर बिकीनी घालायाला देखील आवडते.'



मुलाखतीमध्ये सारानं पुढे सांगितलं की, ती शूटिंगसाठी जेव्हा आईपासून दूर राहते तेव्हा तिला दु:ख होते.



तिला बरेच दिवस आईपासून दूर राहायला आवडत नाही. ती म्हणाली, 'मला शूटिंग दरम्यान 45 दिवस आईपासून दूर राहायला आवडत नाही.



'मुलाखतीमध्ये सारानं तिच्या बालरणीच्या आठवणींबाबत देखील सांगितलं.