जगासह देशभरातील कोरोनाचा फैलाव थांबण्याचं नाव घेत नाहीय देशात कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली आहे गेल्या 24 तासांत 20 हजार 139 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी देशात 16 हजार 906 रुग्णांची नोंद आणि 45 रुग्णांचा मृत्यू झाला होता तुलनेत मृत्यूंची संख्या घटली असली तरी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 482 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे बुधवारी दिवसभरात 38 जणांचा मृत्यू झाला कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 25 हजार 557 वर पोहोचली आहे सध्या भारतात कोरोनाचे 1 लाख 36 हजार 76 सक्रिय रुग्ण आहेत सध्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.49 टक्के आहे नव्या 16 हजार 482 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे देशात एकूण 4 कोटी 30 लाख 28 हजार 356 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत