पाणीपुरी... कदाचितच कोणी असेल ज्याला पाणीपुरी आवडत नसेल. पण तुम्हाला माहितीये का? जिभेचे चोचले पुरवणारी पाणीपुरी आरोग्यासाठीही तितकीच फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यापासून ते मानसिक आरोग्य राखण्यापर्यंत आरोग्याच्या अनेक समस्यांवर पाणीपुरी रामबाण उपाय ठरते. जाणून घ्या पाणीपुरीचे आरोग्यदायी फायदे... अॅसिडीटीपासून सुटका मिळवणायची असेल तर तुम्हीही पाणीपुरी खाऊन पाहा. पाणीपुरीच्या पाण्यातील पदार्थ अॅसिडीटीवर रामबाण उपाय ठरतात. पाणीपुरी तयार करताना वापरलेल्या काही पदार्थांमुळे माऊथ अल्सरची समस्या दूर होते. पाणीपुरी झटपट वजन कमी करण्यास मदत करते. पाणीपुरीचं पाणी तयार करताना वापरलेले पदार्थ तुमचं वाढणारं वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. मूड रिफ्रेश करण्यासाठी काहीतरी थंड पिण्याची अथवा खाण्याची इच्छा होते. अशावेळी पाणीपुरी उत्तम उपाय ठरतो. पाणीपुरीच्या पाण्यात असलेलं जलजीरा, सैंधव मीठ आणि पुदिना मुड रिफ्रेश होण्यास मदत करतं. ही केवळ माहिती आहे, एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.