टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक दिशा वकानी आज (17 ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. दिशाने चित्रपट आणि टीव्ही विश्वात खूप काम केले आहे. परंतु, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी टीव्ही शोमधून तिला ओळख मिळाली. या शोमध्ये दया बेनची भूमिका साकारून ती घराघरात लोकप्रिय झाली. दिशाने आता या शोचा निरोप घेतला असला तरी आजही लोक तिला याच नावाने ओळखतात. दिशाने या पात्रात इतका दमदार अभिनय केला की, तिने शो सोडल्यानंतर पाच वर्षांनंतरही तिची जागा कोणीही घेऊ शकलेले नाही. अभिनेत्री मॅटर्निटी ब्रेकवर गेली आणि एका मुलीची आई झाली, पण त्यानंतर दिशा कौटुंबिक जीवनात इतकी व्यस्त झाली की, तिने शो सोडला आणि परत आलीच नाही. 2008 पासून सुरू झालेल्या या शोमध्ये दिशाने ‘दयाबेन’ हे पात्र बरीच वर्ष साकारले होते आणि त्यासाठी तिला चांगली फी मिळायची. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिशा प्रत्येक एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये आकारायची. दिशाची एकूण संपत्ती 37 कोटींच्या आसपास आहे. दिशाने ही संपत्ती चित्रपट, जाहिराती आणि इतर ब्रँड एंडोर्समेंटमधून कमावली आहे.