मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत असते.



टेलिव्हिजनपासून सुरू झालेला प्राजक्ताचा प्रवास आता सिनेमा आणि ओटीटी पर्यंत येऊन पोहोचला आहे.



‘रानबाजार’सारखी वेब सीरिज करुन प्राजक्ताने तिची नवी छाप प्रेक्षकांवर पाडली.



प्राजक्ता आता महाराष्ट्राची हास्यजत्रामधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



मराठी नाटकं, मालिका, चित्रपट आणि आता वेब सीरिज या चारही माध्यमातून प्राजक्ता प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत असते.



वयाच्या 7व्या वर्षी प्राजक्ताने भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.



अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाकडून तिने भरतनाट्यमच्या सर्व परीक्षांमध्ये प्रथम स्थान मिळवले होते.



प्राजक्ता माळीने मराठीसोबत हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली भाषेत देखील अभिनय केला आहे.