हिना खानने नुकतेच तिच्या बोल्ड फोटोशूटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती नारंगी रंगाच्या पफी स्लीव्ह्स वन पीस ड्रेसमध्ये बोल्ड पोज देताना दिसत आहे. या ड्रेससोबत तिने मरून कलरच्या हाय हिल्स देखील परिधान केल्या आहेत. सोबतच तिने केस मोकळे ठेवले असून, लाईट मेकअप केला आहे आणि ती हॉट फोटो पोझ देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये तिची स्लिम आणि टोन्ड फिगरही दिसत आहे. यात तिचे काही क्लोज-अप फोटो देखील आहेत. यामध्ये तिच्या चेहऱ्यावर चमक दिसत आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हिना खानचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. चाहते यावर भरभरून कमेंट्स आणि लाईक्स करत आहेत. हिना खान ही एक टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. हिना आतापर्यंत अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. याशिवाय तिने अनेक रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला आहे. हिना खान अनेक चित्रपटांमध्येही झळकली आहे. सोशल मीडियावरही तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.