मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या प्रचंड चर्चेत आहे.



नुकताच अभिनेत्रीने तिचा वाढदिवस साजरा केला.



टेलिव्हिजनपासून सुरू झालेला प्राजक्ताचा प्रवास आता सिनेमा आणि ओटीटी पर्यंत येऊन पोहोचला आहे.



‘रानबाजार’सारखी वेब सीरिज करुन प्राजक्ताने तिची नवी छाप प्रेक्षकांवर पाडली.



प्राजक्ता आता महाराष्ट्राची हास्यजत्रामधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



प्राजक्ता माळीने नुकताच 8 ऑगस्टला तिचा वाढदिवस साजरा केला.



आयुष्यातील हा खास दिवस तिने फॅमिली आणि मित्र मैत्रिणींबरोबर आनंदात घालवला.



दरम्यान आता प्राजक्ताने तिच्या बर्थ सेलिब्रेशनचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.



प्राजक्तानं तिच्या वाढदिवसाला मेणबत्या न लावता वाढदिवस साजरा केला.



मोठा थाटमाट करण्याऐवजी प्राजक्ताने कुटुंबासोबत निसर्गरम्य ठिकाणी सुट्ट्यांचा आनंद लुटला.