दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सिंघम गर्ल काजल अग्रवालने एका मुलाला जन्म दिला आहे. काजल सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ काजल सोशल मीडियावर शेअर करत असते. काजल अग्रवाल आणि गौतम किचलू 30 ऑक्टोबर 2020 रोजी लग्नबंधनात अकडले. काजलचा पती गौतम किचलू हा एक इंटिरियर डिझाइनर आहे. काजल अग्रवालचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. काजल अग्रवाल आणि गौतम किचलूचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस येत असतात.