कॉमेडी क्वीन भारती सिंहने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. भारतीच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. भारतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. भारती सिंह प्रेग्नेंसीच्या शेवटच्या दिवसातही काम करत होती. छोट्या पाहुण्याच्या आगमनाने भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया खूश झाले आहेत. भारती सिंह गेले अनेक दिवस तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. भारतीने यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर करत गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. भारतीच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाल्याने चाहते खूश झाले आहेत.