कंगना रनौतच्या ‘लॉक अप' शोच्या नवीन भागात प्रेक्षकांना स्पर्धकांमधील चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे.
या स्पर्धेतील झीशान खान आणि पायल रोहतगी यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला आहे.
झीशान खानवर केलेल्या वादग्रस्त कमेंटमुळे हा वाद सुरू झाला आहे.
झीशान खान आणि पायल रोहतगी यांनी आपापसात चर्चा सुरू केली. परंतु, त्यातून हळूहळू दोघींमध्ये वाद सुरू झाला.
हे भांडण खरे नसून तो एक टास्क होता. या टास्कमध्ये टीम मेंबर्सनी पायलला तिने कमावलेल्या नाण्यांबद्दल विचारल्यानंतर ती काहीच उत्तर देत नव्हती.
टीम मधील एकही सदस्य तिच्यासोबत नीट बोलत नव्हते, त्यामुळे पायलने ही नाणी जेलरला दिली. यानंतर निशा रावल, मंदाना आणि जीशान यांनी पायलला टोमणे मारण्यास सुरुवात केली.
पायलने यावेळी झीशान खानला दहशतवादी म्हटले होते. यानंतर सगळेच तिच्या विरोधात गेले.
याचा राग स्वतः जीशानलाही आला आणि तिने पायल रोहतगीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर पायल रोहतगीने पूनम पांडेला प्रत्युत्तर देताना म्हणाली की, पूनमला फक्त शिवीगाळ करणे एवढेच माहिती आहे.