बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मलायका अरोराच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर शनिवारी खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला. त्यामुळे तिच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली होती. बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता. पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरू केला आहे. मलायकाची प्रकृती आता सुधारत आहे. डॉक्टरांनी मलायकाला आराम करण्याचा सल्ला दिला आहे.