जगभरात कोरोनाचे संकट कायम असून सर्वच देश कोरोना महामारीविरुद्ध लढाई लढत आहेत चीनमध्ये अलीकडच्या काळात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे चीनमध्ये 13,146 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ही जवळजवळ दोन वर्षांपूर्वी पहिल्या लाटेनंतरची सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद आहे शांघायमध्ये एकाच दिवसात विक्रमी 8226 रुग्ण आढळले आहेत राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही माहिती दिली आहे की, चीनमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन प्रकार झपाट्याने पसरत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे चीनमधील शांघाय शहरात कोरोना विषाणूच्या वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊन लागू करण्यात आला होता आज निर्बंध हटणार होते, मात्र आज पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे