‘बिग बॉस 13’पासून अभिनेत्री शहनाज गिलची सर्वत्र चर्चा आहे. तिने आपल्या अभिनयाने आणि लूकने सर्वांना वेड लावले आहे. शहनाजचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.



शहनाज तिच्या नव्या लूकमुळे सर्वत्र आहे. तिचे फोटो रोज व्हायरल होत असतात. नुकतेच शहनाजने फोटोग्राफर डब्बू रतनानीसाठी फोटोशूट केले आहे.



यावेळी शहनाजने रेट्रो लूकमध्ये फोटोशूट केले आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटो शेअर करताना शहनाजने लिहिले - रेट्रो वाइब्स.



फोटोंमध्ये शहनाज वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तिने मल्टी कलरचा पारदर्शक पोशाख परिधान केला आहे. तसेच, स्कार्फपासून हेअरस्टाईल केली आहे.



शहनाजने हातात सनग्लासेस घेऊन फोटो क्लिक केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांची मने घायाळ होत आहेत.



शहनाजच्या फोटोंवर चाहते खूप कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘सना खूप सुंदर आहे.’ तर, इतरांनीही हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.