स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे. स्वराचे वडील नौदलात होते तर आई जेएनयूमध्ये प्राध्यापक होत्या. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय. ती समकालिन घटनांवर बेधडक व्यक्त होते. त्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते. 2009 पासून रुपेरी पडद्यावर स्वरानं पदार्पण केलं. साडीमध्ये स्वराचं सौंदर्य अजून जास्त खुलतं. ती सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते.