आता भाविकांना पुन्हा 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर पाहायला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारकडे दाखल केलेल्या मंदिराच्या विकास आराखड्यानुसार आता मंदिरातील चकचकीत फारशी जाऊन पुरातन दगडी फ्लोरिंग केले जाणार असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
विठ्ठल मंदिराला पुरातन रूप देणारा 61 कोटी 50 लाख रुपये खर्चाचा आराखडा सध्या मंजुरीसाठी राज्य सरकारकडे प्रलंबित असून लवकरच या रखडलेल्या आराखड्याला शासन मंजुरी देईल असे विधी व न्याय राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
यामुळे आता भाविकांना पुन्हा 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर पाहायला मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विठ्ठल मंदिर आणि परिसराचा पहिल्यांदाच विकास आराखडा बनवून तो मंजुरीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला होता.
आषाढी एकादशीच्या पूजेला आलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा आराखडा मंजूर करण्याचे आश्वासन देत सर्व प्रकारे मदतीचा विश्वास दिला होता.
मात्र नंतरच्या काळात हा आराखडा पुन्हा मंत्रालयाच्या लाल फितीमध्ये अडकला असे वाटत असतानाच राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी
रखडलेल्या विकास आराखड्याला राज्यातील आघाडी सरकार लवकरात लवकर मंजुरी देईल असे सांगितल्याने आता हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वाढली आहे.