अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.



23 सप्टेंबर रोजी स्वराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.



स्वरा आणि तिचा पती फहाद अहमद यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मुलीचे काही फोटो शेअर केले.



सोशल मीडियावर फोटो शेअर करुन स्वरानं तिच्या मुलीच्या नावाबद्दल चाहत्यांना सांगितलं.



स्वरा आणि तिचा पती फहाद अहमद यांनी त्यांच्या मुलीचे नाव राबिया असं ठेवले आहे.



स्वराने तिच्या मुलीचे नाव एका सुफी संताच्या नावावरुन ठेवले आहे. राबिया बसरी या इराकमधील एक सुफी संत होत्या



राबिया नावाचा अर्थ 'वसंत' असाही होतो.



स्वरानं राबियाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.



रिचा चढ्ढा, टिस्का चोप्रा,नीना गुप्ता, मोहम्मद झीशान अय्युब या सेलिब्रिटींनी स्वरानं शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन स्वरा आणि फहाद अहमद यांना शुभेच्छा दिल्या आहेत.



काही दिवसांपूर्वी स्वराची बेबी शॉवर पार्टी देखील झाली होती.