क्रूझ ड्रग प्रकरणी अटकेत असणारा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान च्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी केली जाणार आहे.

काल (मंगळवारी) मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली.

दरम्यान या प्रकरणातील मनीष राजगढिया आणि अवीन साहू यांना जामीन मंजूर झाला आहे.

आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्यानं ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत.

नसीबीनं अधिाकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडलं. त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही.

अरबाजच्या बुटात काही प्रमाणात ड्रग्ज सापडलं

दरम्यान, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वात क्रूझ ड्रग्स प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या प्रकरणी दररोज नवनवे दावे करत आहेत.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.