बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला जाऊन आज तीन वर्ष झाली
पण अजूनही त्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. त्याच्या आईचा तो लाडका होताच
पण त्याच्या चाहत्यांचं देखील त्याच्यावर प्रचंड प्रेम होतं. त्याच्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यात आजही पाणी येतं.
त्याचे चाहते त्याच्या मृत्यूनंतर आतापर्यंत रोज त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन सुशांतच्या आठवणींना उजाळा देतात.
सुशांतला चार बहिणी आहेत आणि त्या चौघींचाही तो लाडका होता, त्याची मोठी बहीण श्वेता सिंह आजही सुशांतच्या आठवणीत मग्न असते
परंतु, अभिनेता बनण्याच्या स्वप्नासोबत तो सर्व सोडून मुंबईत आला. त्याला ग्रहांचा अभ्यास करणं पार आवडायचं
त्यासाठी त्याने विशिष्ट टलिस्कोप देखील खरेदी केला होता. त्याच बरोबर तो समाजसेवेत फार सक्रिय होता
एम. एस. धोनी, केदारनाथ, शुद्ध देसी रोमान्स यासह बरेच हिट सिनेमे सुशांतने केले आहेत
पवित्र रिश्ता या सिरीअलमधून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली