2023 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी झाले, जे संपूर्ण सूर्यग्रहण होते. आता वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबरला म्हणजेच आज होणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहणाच्या नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. 2023 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबरला अश्विन अमावस्येच्या दिवशी होत आहे.
हे ग्रहण शनिवारी रात्री 8:34 वाजता सुरू होईल आणि पहाटे 2:25 वाजता संपेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही.
हे ग्रहण पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक आणि आर्क्टिक सारख्या देशांमध्ये दिसणार आहे. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल.
टेक्सासपासून सुरू होणारे हे ग्रहण मेक्सिको तसेच मध्य अमेरिका, कोलंबिया आणि ब्राझीलच्या काही भागांतून केवळ अलास्का आणि अर्जेंटिनामध्येच दिसणार आहे.
हे ग्रहण भारतात दिसणार नाही, पण तुम्ही ते थेट ऑनलाइन पाहू शकता. हे ग्रहण तुम्ही व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रोजेक्टद्वारे पाहू शकता.
हिंदू धर्मात ग्रहणाला खूप महत्त्व आहे. खगोलीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दोन्ही महत्त्वाच्या घटना मानल्या जातात.
जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मधून जातो तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. याला सूर्यग्रहण म्हणतात.
ग्रहणाशी अनेक प्रकारच्या धार्मिक श्रद्धा निगडीत आहेत. सूर्यग्रहणात सुतक कालावधी ग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुरू होतो. ग्रहणापूर्वीचा सुतक काळ अशुभ मानला जातो
धार्मिक मान्यतेनुसार, सुतक काळात पूजा करणे निषिद्ध मानले जाते. ग्रहण दिसत असताना सुतक कालावधी सुरू होतो
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)