कांद्याचे अनेक फायदे सर्वांनाच माहित असतात.

पण कांद्या प्रमाणेच त्याच्या सालीचे ही अनेक फायदे आहेत.

कांद्याची साल केसांच्या काळजीसह आरोग्यालाही खूप फायदेशीर आहे.

कांद्याची साल तुम्हाला गळणारे केस आणि सफेद केसांच्या समस्येपासून वाचवू शकते.

4 ते 5 कांद्याच्या सालीना एका पॅनमध्ये टाकावे.



सोबत 2 कप पाणी टाकून उकळून घ्यावे.

त्यानंतर पाणी गाळून घेऊन थंड झाल्यानंतर ते पाणी केसांच्या मूळाशी लावावे.

1 ते 2 तासानंतर शॅम्पूने धुऊन घ्यावे.

तुम्ही हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाकून वापरु शकता.

असे केल्याने केस गळणे तर थांबेलच सोबतच डँड्रफपासून ही सुटका मिळेल.