तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते.

परंतु तुम्हला माहितीये का तुळशीचा वापर फक्त पूजेसाठी नसून आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

जाणून घ्या काय आहेत तुळशीचे फायदे.

तुळशीची पाने हिवाळ्याच्या त्रासापासून वाचवू शकतात.

रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्यास सर्दी-खोकल्यासारख्या समस्या टाळता येतात.

तसेच घसा खवखवणे, घसा दुखणे यांसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळू शकते.

तुळशीच्या पानांना हृदयाच्या आरोग्याचा खजिना म्हटले जाते.

तुळशीच्या पानांमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

त्याच बरोबर हृदयविकाराच्या झटक्यासारखे आजार दूर राहतात.

दररोज तुळशीची चार पाने खाल्ल्याने त्वचा, यकृत, तोंड आणि फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यास मदत होते.