गृहिणींना रुचकर पदार्थ बनवण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या मधुरा बाचलच्या 'मधुराज रेसिपी'ची भुरळ सुप्रिया सुळेंनादेखील पडली आहे. सुप्रिया सुळे यांनी मधुरा बाचल यांच्यासोबत महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीबद्दल चर्चा केली आहे. मधुरा बाचल यांनी 'मधुराज रेसिपी'ची सुरुवात कशी झाली याबद्दल सुप्रिया सुळे यांना माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी मधुरा बाचल यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेतल्यानंतर त्यांचं कौतुकदेखील केलं. सुप्रिया सुळे यांनी मधुरा बाचल यांच्या घरी भेट दिल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुप्रिया सुळे यांनी मधुरा बाचल यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला आहे. सुप्रिया सुळे यांनी मधुरा बाचल यांच्या घरी हंगामातील पहिल्या आमरसाचा आस्वाद घेतला आहे. सुप्रिया सुळे यांनी मधुरा बाचल यांच्या 'मधुराज रेसिपी'च्या पूर्ण प्रवासाबद्दल अतिशय आपुलकीने आणि आस्थेने ऐकून घेतलं. मधुरा बाचल यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी आमरस, वांग्याची भाजी, मेथीची भाजी असा खास बेत केला होता. सुप्रिया सुळे यांच्यासाठी मधुरा यांनी चांदीच्या ताटात जेवण वाढलं होतं.