बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबतच्या रिलेशनमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. परिणीती आणि राघवचा येत्या 10 एप्रिलला लंडनमध्ये साखरपुडा होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा एकमेकांना डेट करत आहेत. परिणीती आणि राघवला आजवर अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पंजाबमध्ये एकमेकांना पहिल्यांदा भेटले. पंजाबमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत असताना परिणीती राघवला पहिल्यांदा भेटली. शूटिंगदरम्यान परिणीती आणि राघवची चांगली मैत्री झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. परिणीती आणि राघव अनेकदा एकत्र स्पॉट झाल्याने त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. परिणीती आणि राघवच्या साखरपुड्याला जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.