बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या मुंबईत असून तिने नुकतचं चिमुकल्या मालतीसोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. सोशल मीडियावर प्रियंका आणि मालतीचे सिद्धिविनायक मंदिरातील फोटो व्हायरल होत आहेत. सिद्धिविनायकाचं रुप पाहून प्रियंकाची लेक मालतीदेखील भारावली आहे. प्रियंकाने मालतीसह सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याने चाहते तिचं कौतुक करत आहेत. 'देसी गर्ल' भारतात आल्यानंतर भक्तीरसात तल्लीन झाली आहे. सिद्धिविनायक मंदिरातील दर्शन घेतानाचे फोटो प्रियंकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत प्रियंकाने लिहिलं आहे,मालतीचा पहिला भारत दौरा सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने पूर्ण होत आहे. प्रियंका चोप्रा सध्या मुंबईत तिच्या आगामी 'सिटाडेल' या वेबसीरिजचं प्रमोशन करत आहे. सिद्धिविनायकाच्या मंदिरात प्रियंकाला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाल्याने नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. सिद्धिविनायकाच्या मंदिरात फोटो किंवा व्हिडीओ काढण्यास बंदी असूनही प्रियंकाला फोटो कसे काढू दिले असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.