बॉलिवूडचे 'ही-मॅन' अशी ओळख असलेले अभिनेते धर्मेंद्र सोशल मीडियावर सक्रीय आहेत. धर्मेंद्र सोशल मीडियावर आपले लेटेस्ट फोटो, व्हिडीओ पोस्ट करतात. धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर आपला नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धर्मेंद्र स्विमिंग करताना दिसत आहेत. व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी हेल्थ इज वेल्थ अशी कॅप्शन दिली आहे. या वयातही त्यांची एनर्जी, उत्साह पाहून चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले. धर्मेंद्र आपल्या फिटनेसबाबत सजग असल्याचे दिसून आले आहे. व्यायाम करताना अथवा शेतात काम करताना त्यांचा व्हिडीओ समोर येतो. धर्मेंद्र यांनी 'ताज-डिव्हायडेड बाय ब्लड' या वेब सीरीजमध्ये सूफी संताची भूमिका साकारली होती. छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्ये ते हजेरी लावत असतात.