बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. सनीने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो पाहून चाहत्यांच्या नजरा चांगल्याच खिळल्या आहेत. अनेकदा सनी लिओनीच्या फोटोंची सोशल मीडियावरील चर्चा होत असते. हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने सिंपल मेकअप केला असून केसांचा बन बांधला आहे. या लूकमध्ये ती नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये सनी लिओनीने निळ्या रंगाचा थाय हाय स्लीट ड्रेस परिधान केला आहे. तिने पतीसोबतचेही फोटो शेअर केले आहेत. सनी लिओनी तिच्या आयुष्यातील प्रत्येक छोटी-मोठी अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. आता तिचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे. काही मिनिटांतच सनीच्या फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत. सनीचा चाहता वर्ग मोठा आहे. सनीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. सनी लिओनीच्या आयटम साँग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सनी लिओनी लवकरच अर्जुन रामपालच्या आगामी 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या चित्रपटात दिसणार आहे.