बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेलचा 'गदर' हा सिनेमा 2001 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
आता 22 वर्षांनंतर सनी देओलचा 'गदर' हा सिनेमा पुन्हा एकदा सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला.
9 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या 'गदर'ची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे.
सनी देओलने दिल्लीतील एका सिनेमागृहात हजेरी लावली होती. त्यावेळी चाहत्यांसोबत त्याने संवाद साधला.
सनी देओलने 'गदर' सिनेमातील डायलॉगदेखील प्रेक्षकांना ऐकवले.
'गदर' सिनेमाच्या शेवटी 'गदर 2'ची झलक दाखवण्यात आली.
'गदर 2'चा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
सनी देओलचा सिनेमागृहातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो 'दुंस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा' हा डायलॉग बोलताना दिसत आहे.
अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' या सिनेमात सनी देओल, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
'गदर 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.