बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी गेल्या काही दिवसांपासून 'हेरा फेरी 3'मुळे चर्चेत आहे. सुनील शेट्टीची 'हंटर' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुनील शेट्टीची 'हंटर' या वेबसीरिजचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'हंटर'च्या ट्रेलरमध्ये सुनील शेट्टी अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. 'हंटर' या सीरिजमध्ये सुनील शेट्टी एसीपी विक्रम सिंहच्या भूमिकेत झळकणार आहे. सुनील शेट्टीची 'हंटर' ही सीरिज प्रेक्षकांना 22 मार्चपासून पाहता येणार आहे. सुनील शेट्टीने सोशल मीडियावर 'हंटर' या वेबसीरिजा ट्रेलर शेअर केला आहे. सुनीलने आजवर अनेक विनोदी सिनेमांत काम केलं आहे. 'हंटर'मध्ये सुनील शेट्टी पोलीस अधिकारी असला तरी रातोरात मर्डरर कसा होतो हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुनील शेट्टी पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसणार असल्याने चाहते 'अन्ना इज बॅक' असं म्हणत आहेत.