सुकेश चंद्रशेखर हे नाव गेल्या काही दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता सुकेशवर सिनेमा येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुकेशने 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. सुकेश चंद्रशेखरवर आधारित असलेल्या सिनेमाची निर्मिती आनंद कुमारने केली आहे. सुकेश चंद्रशेखरच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाची सिनेप्रेमींना उत्सुकता आहे. 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंगप्रकरणापर्यंतचा सुकेशचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरुमध्ये राहणारा एक उद्योजक आहे. सुकेशने आजवर अनेकांची फसवणूक केली आहे. सुकेश चंद्रशेखर 200 कोटी रुपयांच्या मनी लॉंडिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला भेट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं.