पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रथमच सूर्यफुलांची सजावट करण्यात आली आहे.

कळसापासून गाभाऱ्यापर्यंत 21 हजार फुलांची आरास करण्यात आली आहे.

चैत्र महिन्यात वसंत ऋतूच्या स्वागतासाठी एका जपानी कंपनीकडून ही सजावट करण्यात आली.

सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी आणि ही सुंदर दृश्य टिपण्यासाठी गर्दी केली आहे.

नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे.

श्रीमंत असला तरीही तितकाच दानशूर म्हणूनही हा गणपती ओळखला जातो.

या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती.

याआधी गुढीपाडव्याला देखील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली होती.

यावेळी ही दर्शनासाठी आणि ही सजावट पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती.