श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिरात गुढीपूजन करण्यात आले.

बँडचे मंगलध्वनी, रांगोळीच्या पायघडया आणि साखरेच्या गाठींच्या आकाराची फुलांची आकर्षक आरास

अशा मंगलमय वातावरणात गुढीपाडवा मोठया उत्साहात साजरा झाला.

पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली.

परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्या हस्ते गुढीपूजन करुन गणरायाची आरती करण्यात आले.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, विश्वस्त कुमार वांबुरे,

अमोल केदारी, राजाभाऊ घोडके, मंगेश सूर्यवंशी, विलास रासकर आदी उपस्थित होते.

प्रभात बँड मधील कलाकारांनी गणरायाचरणी सेवा अर्पण केली.



यावेळी गणेशयाग, अभिषेकांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

संदीपसिंह गिल्ल म्हणाले, नवीन वर्ष सुख, शांती व आनंदाचे जावो,

यासाठी आपण गणरायाचरणी नतमस्तक होत आहोत.