पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे आज भुलेश्वराच्या पिंडीवर आज सूर्य किरणांचा अभिषेक झाला.
पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे आज भुलेश्वराच्या पिंडीवर आज सूर्य किरणांचा अभिषेक झाला.
राज्यातील शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून भुलेश्वरच्या मंदिराकडे पाहिलं जातं.
दरवर्षी 28 मार्च आणि 17 सप्टेंबर या दिवशी हा सूर्यकिरण थेट पिंडीवर पडत असते.
या नैसर्गिक प्रक्रियेला किरणोत्सव म्हटलं जातं.
लीप वर्ष असल्यावर एक दिवस अगोदर हा किरणोत्सव होतो.
तर हा किरणोत्सव पाहण्यासाठी भाविक या ठिकाणी येतात.
राज्याबरोबरच राज्याबाहेरील भाविक सुद्धा आज किरणोत्सव पाहण्यासाठी आले होते.
पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे.
भुलेश्वराच्या पिंडीवर सूर्यकिरणांचा अभिषेक