गिरीश बापट यांचा अल्पपरिचय पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला 3 सप्टेंबर 1950 त्यांचा पुण्यातील तळेगावस दाभाडे गावात त्यांचा जन्म झाला होता त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि नातू आहे त्यांच्या जाण्याने कुटुंबियांसोबतच भाजपच मोठी पोकळी निर्माण झाली आहे पुण्याची ताकद अशी त्यांची ओळख होती. पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यात आणि रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गिरीश बापट यांचे पार्थिव दुपारी 2 ते 6 पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी असेल सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होतील. सर्वमावेशक नेता म्हणून त्यांची ओळख होती. अनेक वर्ष राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपला उभं करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती