स्टार प्रवाहच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता दिवसागणिक वाढतेय. शालिनी षडयंत्र करुन जयदीप-गौरीचं आयुष्य संपवणार आहे. शालिनीचा डाव यशस्वी होणार असला तरी खऱ्या प्रेमाचा कधीच अंत होत नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीप-गौरीच्या पुनर्जन्माचा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेच्या विश्वातला हा नवा प्रयोग आहे. या नव्या वळणासह मालिकेचं कथानक २५ वर्षांनी पुढे सरकणार आहे. त्यामुळे अधिराज आणि नित्याची प्रेमकहाणी नव्याने अनुभवता येईल. पुनर्जन्माच्या या कथेत अनेक रहस्यांचाही उलगडा होणारा आहे. सोबतच अनेक नवी पात्रही भेटीला येतील. तेव्हा पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं २० नोव्हेंबरपासून नव्या वेळेत म्हणजेच रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर.