गांधीधाम पुरी एक्सप्रेस गाडीला नंदुरबार स्थानकाजवळ अचानक आग लागली रेल्वे स्टेशनच्या आत येण्याआधीच गाडीला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळालं. जेवण बनवण्याच्या कोच असल्याने कोणीही जखमी किंवा मृत्यू झालेला नाही अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग लागलेला डबा अन्य डब्यांपासून वेगळा कऱण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्टेशन असल्यानं आगीची घटना समजताच लोकांची गर्दी झाली होती. आता आग नियंत्रणात असल्याची माहिती आहे. प्रवाशांमध्ये मात्र अजूनही भीतीचं वातावरण आहे.