अनेक लोकांना पोट साफ न होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकदा लोकं या समस्येसाठी औषधं घेणं देखील सुरु करतात. पण औषधापेक्षा हे उपाय तुम्ही करु शकता. फक्त हे उपाय रात्री झोपण्यापूर्वी करावेत. झोपण्याआधी सकाळी गरम पाण्यात एक चमचा त्रिफळाचं चूर्ण मिसळून खावं. रात्री पपई खाऊन झोपल्यास फायदेशीर ठरु शकतो. जेवणासोबत भरपूर प्रमाणात सलाड पण खाल्ल्याने उपयुक्त ठरु शकते. जेवणासोबत पाणी पिण्याऐवजी ताक प्यावे. रात्री उशीरापर्यंत जागू नये. रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात डेअरी प्रॉडक्टचा वापर करु नये.