सुदृढ शरीरासाठी व्यायाम गरजेचा असतो. लहानापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना व्यायामाची आवश्यकता असते. मोठे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींनी व्यायाम करणे टाळावे. खेळतांना लहान मुलांचा व्यायाम होत असतो त्यामुळे, त्यांना वेगळा व्यायाम करण्याची आवश्यकता नसते. तरुणांनी मात्र वाढत्या वयाच्या गरजानुरूप व्यायामाकडे अधिक लक्ष द्यायला हवे. व्यायामामध्ये ट्रेकिंग, धावणे, पोहणे, चालणे या प्रकारांचा समावेश करावा. पन्नाशीनंतर चालण्यासारखा व्यायाम हा उत्तम मानला जातो. व्यायामाची सुरुवात दहा ते पंधरा मिनिटांपासून करून ती तासापर्यंत वाढवत न्यावी. आठवड्यात किमान तीन ते चार तास व्यायाम करायला हवा.