द्राक्षाचे सेवन आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

द्राक्षामध्ये अनेक पोषक घटक आढळतात.

काळ्या द्राक्षाच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

ज्यांना हृदयविकार, कोलेस्ट्रॉलचा तसेच रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी काळ्या द्राक्षाचे सेवन करावे.

द्राक्षात आढळणाऱ्या पोषक घटकांमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

दृष्टी सुधारण्यासाठी द्राक्षांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम, बीटा कॅरेटीन सारखे पोषक घटक आढळतात.

ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे अशा व्यक्तींनी नियमित द्राक्षाचे सेवन केल्यास त्यांचा त्रास कमी होऊ शकतो.

नियमित द्राक्षाचे सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी द्राक्ष फायदेशीर ठरतात.