भारतीय शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसून येत आहेत
शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली. बुधवारी झालेल्या घसरणीनंतर आज बाजार सावरल्याचे चित्र आहे
बँक आणि आयटी क्षेत्रातील शेअर वधारले आहेत. बुधवारी अमेरिकन शेअर बाजार घसरला होता. त्याचा परिणाम आशियाई बाजारावरही दिसून आला
प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 113 अंकांनी वधारत 60460 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी 18050 च्या पातळीवर होता
सकाळी 9.35 वाजता सेन्सेक्स 214 अंकांनी वधारत 60,560.97 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी 64 अंकांनी वधारत 18,067.75 अंकावर व्यवहार करत होता
आज शेअर बाजारात बँक निफ्टीने उच्चांक गाठला आहे
हँक निफ्टीमध्ये 400 हून अधिक अंकांची उसळण दिसून आली
सध्या बँक निफ्टी 41806 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे